मोठी दिलासादायक बातमी; ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल...
- MahaLive News
- Apr 24, 2021
- 1 min read

#नागपूर- कोराेना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजन आयात करण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकारने रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी केली. त्यातील पहिली रेल्वे नागपूरमध्ये दाखल झाली असून राज्यातील कोरोना रुग्णांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. देशात सर्व राज्यांकडून होत असलेली ऑक्सिजनची मागणी पाहता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी केली होती. यातील पहिली रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली. या ऑक्सिजन एक्सप्रेसबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून प्राणवायू प्राप्त करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक काेरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून या रुग्णांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. ऑक्सिजन पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना रुग्णांसाठी मात्र, ऑक्सिजन पुरवठा होणे महत्त्वाचे आहे.
@महालाईव्ह न्युज नागपूर
Comments