top of page

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली रिक्षाचालकांना पंधराशे रुपयांचे मदत कधी मिळणार...?


ree

#औरंगाबाद- १४ एप्रिल पासून लागू झालेल्या कडक निर्बंधांच्या धर्तीवर राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे तर राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. अशी घोषणा १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लॉकडाऊन संपत आले आहे तरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत पोहोचलेली नाही. रिक्षाचालक, पथविक्रेते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. रिक्षाचालक, फेरीवाले यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि मदत विनाअट देण्यात यावी अशी मागणी औरंगाबाद आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातील मजुरांचे ९० टक्के लोकांची लॉकडाऊनमुळे नोंदणी झालेली नाही. त्यांनाही या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बांधकाम क्षेत्रातील काम बंद असल्यामुळे व रिक्षाचाही व्यवसाय होत नसल्याने जवळील सर्व पैसे खर्च झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली रक्कम लॉकडाऊनच्या काळातच देण्यात यावी. हि मदत वेळेत मिळाल्यास कुटुंबाला हातभार लागेल. तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचे काम कोरोनामुळे बंद पडले आहे. त्यामुळे संत जनाबाई कल्याण योजनेअंतर्गत त्यांना मदत मिळू शकते. त्यांना या योजनेअंतर्गत १५०० रुपये देण्याचे जाहीर करण्यात यावे. अशा मागण्या आम आदमी पार्टीने केल्या आहेत. मराठवाडा अध्यक्ष डॉ. सुभाष माने, मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page