Search
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेतला; जेजे रुग्णालयात पार पडलं लसीकरण...
- MahaLive News
- Apr 8, 2021
- 1 min read

#मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच, राज्याचे सचिव सीताराम कुंटे यांनीही यावेळी कोरोना लस घेतली. जेजे रुग्णालयात हे लसीकरण पार पडले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ११ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत ठाकरेंनी कोव्हॅक्सिन लसीचा डोस घेतला होता. दरम्यान, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. राज्यातील वाढत्या कोरोना प्रसाराबाबत पंतप्रधान आज सायंकाळी उद्धव ठाकरेंशी संवाद साधणार आहेत.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments