Search
बाप-लेकाचा कोरोनाने केला घात; तीन दिवसांत कुटुंबातील दोघांचा मृत्यू...
- MahaLive News
- Apr 18, 2021
- 1 min read

#लातूर- लामजना (ता.औसा) येथील बाप-लेकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. संजय शंकर कुंभार (वय ४९) आणि अनिल संजय कुंभार (२९) अशी मृतांची नावे आहेत. संजय कुंभार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वीटभट्टीचा व्यवसाय उभा केला होता. सायकल दुरुस्तीचे दुकान ते वीटभट्टीचे मालक असा त्यांचा प्रवास संघर्षशील होता. त्यांच्यासह त्यांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली होती. गुरुवारी (ता.१५) संजय यांचे लातूरच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या पाठोपाठ शनिवारी (ता.१७) मुलगा अनिल याचेही कोरोनाने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे कुंभार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
@महालाईव्ह न्युज लातूर
Comments