top of page

बेधुंद ड्रायव्हरने आठ जणांना उडवले; तीन जण जागीच ठार, एक अत्यवस्थ


ree

#रायगड- गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे प्रकार वाढत चालले आहेत. रायगडमधल्या अलिबागमध्येही एक जबरदस्त अपघात घडलाय. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील जेएसडब्लू येथून रोहा बाजूकडे येणाऱ्या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत रेवदंडा ते चणेरापर्यंत आठ लोकांना उडवले, त्यातील तीन जण जागीच ठार झाले असून, एक महिला अत्यवस्थ आहे, तर चार जण किरकोळ जखमी आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेवदंडा बाजूकडून (एमएच 04 ईवाय 8501) या गाडीच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत साळाव, आमली येथे प्रत्येकी एक व्यक्तींना उडवले, तर चेहेर येथे दोन व्यक्तींना धडक मारून जखमी केले. त्यानंतर भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे नेली. पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न केला असता, त्याने अनेक गाड्या आणि अडथळे उडवून लावत भरधाव वेगाने ट्रक नेत न्हावे फाट्यानजीक एका जोडप्याला आणि त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा शिक्षक लक्ष्मण ढेबे आणि त्यांचा मुलगा जागीच ठार झाला. तसेच त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झालेत. सदर अपघात एकदम भीषण होता. महत्त्वाचे ट्रकने दिलेल्या धडकेत संबंधित शिक्षकांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून, गाडी सुमारे चारशे मीटर फरफटत नेली. त्यानंतर सदर चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडेला जोरदार धडक दिल्यानं सदर व्यक्तीदेखील जागीच मृत झाली. भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगावनजीक स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. सदर घटनेचे वृत्त समजताच स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा प्रक्षोभ आहे.

@महालाईव्ह न्यूज रायगड

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page