बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय; 3 जणांचा मृत्यू, 22 रुग्णांवर उपचार सुरू…
- MahaLive News
- May 15, 2021
- 1 min read

#बीड- जिल्हयात म्युकरमायकोसिस या आजाराच्या 22 रुग्णांवर आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान 14 रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून 3 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून चार जण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बीड जिल्ह्यातदेखील हा आजार आता पाय पसरत असल्याचे चित्र आहे. सरकारी दवाखान्यात अद्याप फारसे रुग्ण आढळले नसले तरी, खासगी दवाखान्यांमध्ये मात्र लवकर म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. लक्षणे आढळताच वैद्यकीय उपचार घेतल्यास आजार बरा होऊ शकतो मात्र काळजी घेणे गरजेचे आहे, बीडच्या बारकूल हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 8 रुग्णांवर उपचार केल्याचे वैद्यकीय तज्ञ डॉ. अनिल बारकूल यांनी सांगितले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज बीड
Comments