बीड जिल्ह्यात कोविड सेंटरमधून २२ रुग्णांनी काढला पळ...
- MahaLive News
- May 24, 2021
- 1 min read

#बीड- शिरुर कासार येथील शासकीय वसतिगृहात उभारलेल्या कोविड केअर केंद्रामधून सौम्य लक्षणे असलेल्या २२ रुग्णांनी पळ काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अर्धवट उपचार सोडून पळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र रुग्ण निघून जात असताना यंत्रणेतील कर्मचारी नेमके काय करत होते. त्यांच्या हलगर्जीपणाविरुद्ध काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शंभरांवर शासकीय व लोकसहभागातील कोविड केअर केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तालुका पातळींवर शासकीय वसतिगृहांत तसेच इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. शिरूर कासारला शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर आहे. सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात. ता.१४ ते २१ मे या सात दिवसांत या केंद्रामधून तब्बल 22 बाधित रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे. शिरूर कासार, बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, पौंडुळ, जांब, मानूर, हिवरसिंगा, झापेवाडी, दगडवाडी, नारायणवाडी या गावातील हे रुग्ण आहेत. त्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला आहे. सात दिवसांच्या कालावधीत एकेक, दोन-दोन रुग्ण निघून जात असताना आरोग्य विभागाची यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन शिरुर कासार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज बीड
Comments