top of page

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून 30 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद...


ree

#पंढरपूर- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे. याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने 'मिशन ब्रेक द चेन' या मोहिमेअंतर्गत राज्यातील धार्मिक, प्रार्थना स्थळे 5 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीलाही मंदिर बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे हे मंदिर आजपासून (5 एप्रिल) 30 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश मंदिर समितीकडून देण्यात आले आहेत. पंढरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंदिर समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत विठ्ठल मंदिर 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बंदच्या काळात पांडुरंगाची नित्य उपासना सुरू राहणार आहे.

@महालाईव्ह न्यूज पंढरपूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page