नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढले; सद्यस्थितीत जिल्ह्यात 140 पेक्षा जास्त रुग्ण…
- MahaLive News
- May 15, 2021
- 1 min read

#नाशिक- जिल्ह्यातला कोरोना कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस सारखा बुरशीजन्य आजाराचा धोका वाढू लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 140 पेक्षा जास्त रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक टास्क फोर्सची स्थापना देखील केली आहे. म्युकरमायकोसिस हा आजार कोविड मधून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना या बुरशीचा संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. ज्या रुग्णांना उच्च मधुमेह आहे, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशा लोकांना ही म्युकरमायकोसिस होत आहे.

अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉइडचा अतिवापर, अतिदक्षता विभागात दीर्घकाळ उपचार,अवयव प्रत्यारोपण, ट्युमर अशा आजाराचे रुग्ण या नवीन त्रासाचे बळी ठरत आहे. म्युकरमायकोसिस हा आजार नासीकेच्या आतुन हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्याकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुप्फुसे आणि मेंदूपर्यंत देखील पसरू शकतो. या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तिथल्या त्वचेचा रंग बदलतो दृष्टी अधू होते छातीत दुखू लागणे श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे अशी वेगवेगळी लक्षणे देखील जाणवू लागली आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज नाशिक
Comments