नांदेडमध्ये शीख समुदायाकडून पोलिसांवर हल्ला; 20 जणांना अटक, तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल...
- MahaLive News
- Mar 30, 2021
- 1 min read

#नांदेड- नांदेडमध्ये शीख समुदायाकडून काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 60 जण हे आरोपी असल्याचे निष्पन्न झालं आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तब्बल 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात 60 जण आरोपी असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अद्यापही पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. या सर्व घटनेनंतर नांदेडमध्ये शांतता पसरली आहे. नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तसेच परिसरातील गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
@महालाईव्ह न्यूज नांदेड
Comments