नागपुरात आतापर्यंत म्युकरमायकोसिसने 26 रुग्णांचा मृत्यू, 600 जणांना बाधा...
- MahaLive News
- May 19, 2021
- 1 min read

#नागपूर- कोरोनानंतर राज्यात मुक्यरमायकोसिस या आजाराने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या बुरशीजन्य संसर्गाने आतापर्यत नागपुरात तब्बल २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण ६०० जणांना या ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला आहे.

त्यामुळे नागपूरसह विदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये म्युकर मयकोसिस या संसर्गाची अनेकांना बाधा झाली आहे. मार्चपासून आतापर्यंत तब्बल 600 हून अधिक रुग्णाना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले असल्याचा दावा कान-नाक-घसा डॉक्टर विदर्भ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत निखाडे यांनी केला आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ सरकारी आकडे पाहता 284 जणांना बाधा झाली असून 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज नागपूर
Comments