दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; दहावीची परीक्षा जूनमध्ये व बारावीची परीक्षा मे महिन्यात...
- MahaLive News
- Apr 12, 2021
- 1 min read

#मुंबई- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची घोषणा स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्यात, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकट काळात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तणावाखाली सुरू आहे. परीक्षेविषयी अस्वस्थता आहे. याची मला पूर्ण कल्पना आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विविध पक्षीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आदींसोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची सर्वप्रथम जबाबदारी आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच, आता बारावीची परीक्षा मे महिन्यात, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षांचे नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचबरोबर, राज्य शासनाच्या मंडळाप्रमाणे इतर शिक्षण मंडळांनीही परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले.
@महालाईव्ह न्युज मुंबई
Comments