top of page

दिलासादायक; औरंगाबादच्या चार रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प सुरू...


ree

#औरंगाबाद- कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना दिलासादायक बातमी आहे. औरंगाबाद येथील चार रुग्णालयांनी ऑक्सिजनच्या बाबतीत नवी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. मराठवाड्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या पाहता दररोज 160 मेट्रिक टन ऑक्‍सिजन आवश्यकता असते. तर पुढील काही दिवसात ही मागणी 220 ते 250 मेट्रिक टन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑक्सिजन मिळविण्यासाठी मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. यावर तोडगा म्हणून औरंगाबादच्या चार रुग्णालयाने हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये सिग्मा हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल आणि लाईफलाईन रुग्णालयाचा समावेश आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा असल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करावा लागणार नसल्याचा विश्वास रुग्णालय संचालकांनी व्यक्त केला आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करण्यासाठी साधारणता अडीशे स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असते. हवेत 21 टक्के ऑक्सीजन असते. कॉम्प्रेसरच्या साह्याने ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. त्यानंतर टॅंकमध्ये ऑक्सिजन साठवून पाइपलाइनच्या माध्यमातून त्याचा पुरवठा व्हेंटिलेटरला केला जातो. अमेरिकेच्या अरॉक्स कंपनीचे यंत्र वापरले जाते. हे यंत्र आल्यावर अवघ्या पंधरा दिवसात त्याची उभारणी केली जाऊ शकते, अशी माहिती सिग्मा रुग्णालयाचे डॉ. उन्मेष टाकळकर यांनी दिली. सिग्मा रुग्णालयात उभारली यंत्रणा सिग्मा रुग्णालयाचे डॉक्टर टाकळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2013 मध्ये पहिला ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यात आला. त्यानंतर 2016 आणि 2020 मध्ये दोन प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. तर आता लवकरच चौथा प्रकल्पदेखील तयार करत करण्यात येत आहे. पहिल्या दोन प्रकल्पध्ये 116 आणि त्यानंतर 50 सिलेंडर निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. आता लवकरच 30 सिलेंडरचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सिग्मा रूग्णालयात कोरोना नसलेले रुग्ण तर 50 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. महिन्याकाठी पाच ते सहा हजार वर्षाकाठी 60 ते 65 हजार सिलेंडर उत्पादन केले जाते. प्रकल्प उभारल्यापासून ऑक्सिजनसाठी धावपळ करण्याची गरज नसल्याचे डॉ. टाकळकर यांनी सांगितले. औरंगाबादच्या एम्स रुग्णालयामध्ये 23 मार्च 2019 रोजी हवेतून ऑक्सीजन घेण्याचा प्रकल्प उभारण्यात आला. 24 तासात 58 सिलेंडरची निर्मिती होत आहे. बाहेरून सिलेंडर आणण्याची गरज भासत नसल्याचे मुख्य प्रशासक विलास काळे यांनी सांगितले. जवाहर नगर भागातील माणिक रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी 32 लाख रुपये खर्च करून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामध्ये 32 सिलेंडर ऑक्सिजन तयार केले जाते. त्यामुळे कोरोनाच्या महामारीच्या आधीपासूनच बाहेरून ऑक्सिजन आणण्याची गरज लागली नाही. तर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपूर्वीच प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामधून 58 सिलेंडर ऑक्सिजन तयार केले जाते. त्यात लवकरच एक नवीन प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती लाइफ लाईनच्या संचालकांनी दिली आहे.

@महालाईव्ह न्युज औरंगाबाद

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page