top of page

दुकान, मॉल ते धार्मिक स्थळं, महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय ए टू झेड नियमावली


ree

#मुंबई- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू होणार आहे. तर दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चैनची नियमावली जारी केली आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

- ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी - टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या 50 टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी - सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास 500 रुपये दंड - सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घ्यावे - 10 एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक - रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड - ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही - लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई - सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्याची गरज

महाराष्ट्रात खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

- खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी - येत्या शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही - केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी - खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं - 10 एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक - ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार - RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड (Maharashtra Lockdown All Rules and Guidelines)

प्रार्थना स्थळांसाठी नियम काय?

- सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद राहणार - धार्मिक स्थळाशी संबंधित पुजारी, कर्मचारी फक्त धार्मिक स्थळी प्रवेश - धार्मिक स्थळाशी संबंधित पुजारी, कर्माचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना लसीकरण करावे

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी ब्रेक द चेन नियम

- सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार - रेस्टॉरंट्सना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलीव्हरी सेवा देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी - शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलीव्हरी सेवा सुरु राहणार, ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही - निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार - 10 एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक - ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार - RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड - हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण लवकर करुन घ्यावं

दुकान, बाजारपेठा आणि मॉल्ससाठी नियम

- अत्यावश्यक वस्तूची दुकान , बाजार वगळता सर्व दुकानं , बाजार आणि माँल्स बंद राहतील - अत्यावश्यक दुकानात काम करणा-या मालकासह आणि कर्मचा-याचं लवकर कोरोना लसीकरण करणं गरजेचं - ग्राहक आणि दुकानदार यांच्यात पारदर्शक काच किंवा प्लाँस्टिकच्या पारदर्शक शिल्डचा वापर करणं गरजेचं - सोशल डिस्टन्सिंग ठेवणं महत्त्वाचं

शाळा आणि महाविद्यालय नियम

- शाळा आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद असतील - 10 आणि 12 विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी नियमात शिथिलता असेल. - परीक्षा घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेतलेली असावी. - कर्मचा-यांचा RTPCR कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असावा (हा रिपोर्ट केवळ 48 तास ग्राह धरणार )

लग्न कार्यासाठी नियम

- 50 जणांच्या उपस्थितीत लग्न कार्यास परवानगी - लग्न समारंभात सेवा देणा-या हाँल कर्मचा-यांचं कोरोना लसीकरण झालेले असावं - हॉलमधील कर्मचा-याचं RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावं - RTPCR कोरोना चाचणी निगेटीव्ह असल्य़ाचा रिपोर्ट नसल्यास 1 हजार रूपायांचा दंड आणि हाँलच्या व्यवस्थापनाला - 10 हजार रूपायांच्या दंडाची शिक्षा - सतत हाँल आणि मंगलकार्यलयाकड़ून नियमाचं उल्लघंन झाल्यास संबंधित परिसर सील केला जाणार

अत्यसंस्कारासाठी ब्रेक द चेन नियम

-20 जणांच्या उपस्थितीत अत्यसंस्कार करण्यास परवानगी -स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी कोरोना लसीकरण केलेलं असावं -किंवा RTPCR कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक

सहकारी निवासी सोसायटीसाठी नियम

-सहकारी निवासी सोसायटी 5 पेक्षा कोरोना रूग्ण आढल्यास मायक्रो कंटेमेंट झोन घोषित केला जाणार -अशा सोसय़टीने बाहेरून येणा-या सोसयटीत प्रवेश देता येणार नाही तसा फलक सोसायटीच्या दर्शनी भागासमोर लावावा लागेल -सोसाय़टीकडून या नियमाचं पालन न झाल्यास 10000 रूपायांचा दंड बसणार -सहकारी निवासी सोसायटीत नेहमी ये जा करणा-यांच्या RTPCR टेस्ट करून घेणं किंवा कोरोना लसीकरण करावं.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page