तीन दिवसात राज्यांना मिळणार ४८ लाख लशींचे डोस; केंद्र सरकार...
- MahaLive News
- May 24, 2021
- 2 min read

नवी दिल्ली- राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांकडे १.८० कोटी कोरोनाचे डोस आहेत. येत्या तीन दिवसांत राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना ४८ लाखांहून अधिक कोरोना लशींचे डोस मिळणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. केंद्र सरकारकडून औषधी कंपन्यांकडून कोरोना लशींची थेट खरेदी होत आहे. हे कोरोना लशींचे डोस केंद्राकडून राज्यांना मोफतपणे वितरित करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना २१.८० कोटीहून अधिक लशींचे डोस वितरित केले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार २३ मेपर्यंत २० कोटी ८ हजार ८७५ लशींचा वापर झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांकडे कोरोना लशींचे १ कोटी ८० लाख १५ डोस उपलब्ध आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये राज्यांना ४८ लाख ६५० हून अधिक कोरोना लशींचे डोस वितरित केले जाणार आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिम देशात राबवित आहे. या मोहिमेंतर्गत राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लशींचे मोफत डोस वितरित करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना लशींचा पुरेसा साठा नसल्याने देशात लसीकरण मोहिम कासवगतीने सुरू आहे. त्यावरून केंद्र सरकारवर विविध स्तरामधून टीका करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तुटवड्यावर कोव्हिशिल्ड लस निर्माती कंपनी सीरम इन्स्ट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर नुकतेच बोट ठेवले आहे. लशीची उपलब्धता, जागितक आरोग्य संघटनेने दिलेली नियमावली विचारात न घेता केंद्राने विविध वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची घाई केली असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. सुरुवातीला ३० कोटी लोकांना लस द्यायची होती. त्यासाठी ६० कोटी लशी लागणार होत्या, ते उद्दिष्ट पूर्ण होण्याआधीच ४५ वर्षांवरच्या सर्वांसाठी आणि लगेच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले केले गेले. तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध नाही, हे माहिती असताना, असे निर्णय घेतले गेले असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, हा गट दुर्लक्षित असून कोरोना योद्धे वा फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्यांना दर्जाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा गट लसीकरण मोहिमेतही प्राधान्य क्रमावर नाही. या पार्श्वभूमीवर औषध विक्रेते-फार्मासिस्टना प्राधान्य क्रमाने लस द्यावी. अन्यथा देशभरातील साडे नऊ लाख औषध विक्रेते संपावर जाऊ, असा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे (एआयओसीडी) अध्यक्ष जगनाथ शिंदे दिला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज नवी दिल्ली
Comments