top of page

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच तर पालिकेकडून पाच लाखांची मदत...


ree

#नाशिक- नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळती आटोक्यात आली असून वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले सुमारे १२० हुन अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर होते. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून आलं. यानंतर, राज्याचे मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नाशिक महापालिका प्रशासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मृत नातेवाईकांना देण्यात येणार आहे. तर, सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत अशी एकूण १० लाखांची मदत मृत नातेवाईकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

@महालाईव्ह न्यूज नाशिक

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page