Search
जिल्हयातील सर्व ग्रामीण रुग्णालये येथे समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र (DCHC)स्थापन होणार...

#लातूर- जिल्हयात कोव्हीड-19 रुग्णांची वाढ होत असून तेथे अतिरिक्त् व्यवस्था करणे अगत्याचे झाले आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामीण रुग्णालये येथे समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (DCHC)स्थापन करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्हयातील सर्व ग्रामीण रुग्णालये येथे समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (DCHC) स्थापन करण्याचे आदेश देत आहेत. यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांनी करुन घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
@महालाईव्ह न्यूज लातूर





















Comments