चिंताजनक; लातूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर; ७०७ जणांना कोरोनाची लागण; ३३४९२ पॉसिटीव्ह रूग्ण
- MahaLive News
- Apr 1, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १००५ आरटीपीसीआर चाचणी व २०३९ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन ७०७ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ३३ हजार ४९२ झाली आहे. आणि, आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन ७०७ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ३३ हजार ४९२ झाली. आतापर्यंत २७ हजार ७६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ४९८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील २१२ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील ९७० ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील २८१ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ३५१७ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ४९८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १००५
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २०३९
आजचे रूग्ण - ७०७
एकुण रूग्ण - ३३४९२
बरे झालेले रूग्ण - २७७६०
ऍक्टिव्ह रुग्ण - ४९८०
आजचे मृत्यू - १
एकुण मृत्यू - ७५२
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments