चिंताजनक; लातूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर; ६८५ जणांना कोरोनाची लागण; ३५५४९ पॉसिटीव्ह रूग्ण
- MahaLive News
- Apr 4, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ७४२ आरटीपीसीआर चाचणी व २४६९ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन ६८५ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ३५ हजार ५४९ झाली आहे. आणि, आज १० मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन ६८५ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ३५ हजार ५४९ झाली. आतापर्यंत २९ हजार ०६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ५७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील २६४ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील ११२० ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ३६३ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ३९६७ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ५७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - ७४२
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २४६९
आजचे रूग्ण - ६८५
एकुण रूग्ण - ३५५४९
बरे झालेले रूग्ण - २९०६०
ऍक्टिव्ह रुग्ण - ५७१४
आजचे मृत्यू - १०
एकुण मृत्यू - ७७५
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments