गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा मुत्यू…

#गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच पोलिस आणि नक्षलवाद्यांमधील संघर्ष निर्माण होत असतो. काही दिवसांपपूर्वी झालेल्या चकमकीमध्ये पोलिस दलाचे अनेक जवान शाहिद झाले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार , गडचिरोलीमधील धानोरा तालुक्यातील राज्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळच्या सुमारास पुन्हा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

पोटेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत भेंडीकनार गावाच्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास ही चकमक उडाली यात काही नक्षलांच्या खात्मा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गडचिरोली पोलिस दलाचे सी ६० जवान गडचिरोली धानोरा तालुक्याचा सीमावर्ती भागातील भेंडीकनार गावाच्या जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित होते. त्यामुळे तिथे दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी C ६० जवानांवर अंधांधुंध गोळीबार सुरु केला. पोलिसांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. जवानांनीही गोळीबार सुरु केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. यानंतर परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. यात पोलिसांना तिथे काही नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळुन आले आहेत . सी ६० जवानांकडून अजूनही युद्धस्तरावर शोध मोहीम सुरु आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या चकमकीत नक्की किती नक्षल्यांचा मृत्यू झाला याबाबत अजूनही ठोस माहिती मिळू शकली नाही.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज गडचिरोली






















Comments