top of page

कठीण काळात मदतीला धावून आले अंबानी; 700 टन ऑक्सिजनचा करणार मोफत पुरवठा...


ree

#मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारची चिंताही वाढली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. यात रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत असल्यानं आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशा कठीण काळात राज्याच्या मदतीला अनेक उद्योजक पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील ऑक्सिजन तुटवडय़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने भक्कम पुढाकार घेतला आहे. कंपनीने खूप कमी वेळेत ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढवली असून सध्या कंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना दररोज 700 टनहून ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला जात आहे. रिलायन्सच्या या पुढाकारामुळे दररोज कोरोनाच्या 70 हजार गंभीर रुग्णांना जीवदान मिळणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीमधून सुरुवातीला 100 टन मेडिकल-ग्रेड ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. मात्र सध्या देशभर ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे पंपनीने ऑक्सिजन उत्पादन क्षमता 700 टक्क्यांच्या पुढे नेली आहे. जामनगर रिफायनरीमधून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांबरोबरच दीव-दमण आणि दादरा नगर हवेली या पेंद्रशासित प्रदेशांनाही मोफत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. 183 अंश सेल्सिअस तापमान असणाऱया विशेष टँकर्समधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी रिलायन्स फाऊंडेशनने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने मुंबईत देशातील पहिले कोविड हॉस्पिटल सुरू केले. 100 बेडचे हे हॉस्पिटल केवळ दोन आठवड्यांत स्थापित केले गेले, लवकरच ते 250 खाटांवर वाढविण्यात आले. रिलायन्सने महाराष्ट्रातील लोधीवाली येथे पूर्णपणे सुसज्ज विलगीकरण सुविधा तयार केली आणि ती जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page