top of page

कोरोनासह मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा...


ree

#मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा आज घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत मुंबई महापालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती आणि महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. राज्यात मागील 24 तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे तर 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 53 हजार 335 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 36 लाख 39 हजार 855 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. 59 हजार 153 जणांचा मृत्यूआज राज्यात 349 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 59 हजार 153 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.63 टक्के इतका झाला आहे.6 लाखांहून अधिक सक्रिय रुग्णराज्यात 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. 29 लाख 59 हजार 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे.राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद कुठे किती रुग्ण?

मुंबई महानगरपालिका - 8 हजार 209

ठाणे- 1 हजार 24

ठाणे महानगरपालिका- 1 हजार 597

नवी मुंबई-1 हजार 184

कल्याण डोंबिवली- 1 हजार 611

उल्हासनगर-198

मीराभाईंदर-485

पालघर-483

वसई विरार महानगरपालिका-567

रायगड-793

पनवेल महानगरपालिका-677

नाशिक-1 हजार 592

नाशिक महानगरपालिका-3 हजार 235

अहमदनगर-2 हजार 264

अहमदनगर महानगरपालिका-713

धुळे- 292

धुळे महानगरपालिका-228

जळगाव-703

जळगाव महानगरपालिका-153

नंदुरबार-387

पुणे- 2 हजार 455

पुणे महानगरपालिका- 5 हजार 469

पिंपरी चिंचवड- 2 हजार 37

सोलापूर- 762

सोलापूर महानगरपालिका-293

सातारा - 1 हजार 153

कोल्हापुर-240

सांगली- 657

औरंगाबाद महानगरपालिका - 853

सिंधुदुर्ग-363

रत्नागिरी-422

औरंगाबाद-495

जालना-735

हिंगोली-333

परभणी -530

परभणी महानगरपालिका-388

लातूर 1 हजार 178

लातूर महानगरपालिका-457

उस्मानाबाद-685

बीड -993

नांदेड महानगरपालिका-466

नांदेड-782

अकोला महानगरपालिका-221

अमरावती महानगरपालिका-276

अमरावती - 480

यवतमाळ-254

वाशिम - 300

नागपूर- 2 हजार 176

नागपूर महानगरपालिका-4,899

वर्धा-387

भंडारा-1 हजार 252

गोंदिया-602

चंद्रपुर-1 हजार 29

चंद्रपूर महानगरपालिका - 512

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page