कोरोनाच्या लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी; राज्यपालांकडून सरकारच्या कामगिरीचे कौतुक...
- MahaLive News
- May 2, 2021
- 1 min read

#मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. पण महाराष्ट्र सरकारने या साथीचा आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. राज्यात लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. राज्यात 1 कोटी 37 लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करून महाराष्ट्र लसीकरणात देशात अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीचे कौतुक केले. कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी पाच हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवनावर आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. तेव्हा महाविकास आघाडीच्या विविध योजनांचा आढावा घेत राज्य सरकारच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. ावेळी त्यांनी गरीबांना मोफत शिवभोजन थाळी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, शेतकऱयांना वीज बिल सवलत अशा विविध योजनांचा आढावा घेतला. कोविडच्या कामगिरीचे कौतुक करताना ते म्हणाले की, गेल्या सुमारे सवा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजुटीने लढत आहोत. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने विविध उपाय योजले आहेत. राज्याच्या विनंतीवरून केंद्र सरकारमार्फत हाफकिन संस्थेस लस उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात उत्पादित होणारा ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी शंभर टक्के राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठय़ासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने रेल्वेची विशेष 'ऑक्सिजन एक्प्रेस' रवाना करण्यात आली. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे, असेही राज्यपाल म्हणाले. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेताता ते म्हणाले की, कोस्टल रोड प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरू असून वांद्रे ते वर्सेवा सागरी सेतूचे काम सुरू झाले आहे. मुंबईतील 14 मेट्रो लाइन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतिपथावर आहे. सर्व 14 मेट्रो लाइन्सची कामे पूर्णत्वाच्या विविध टप्प्यावर असल्याचे ते म्हणाले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments