कार आणि रिक्षाच्या अपघातात अचानक स्फोट; CNG टाकीच्या स्फोटात 4 ठार...
- MahaLive News
- Mar 29, 2021
- 1 min read

#रायगड- गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडूनही वाहन चालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात येतात. कर्जत ते नेरळ रोडवर डिकसळ येथे कार आणि रिक्षाच्या धडकेत अचानक स्फोट झालाय. या अपघातात एकूण 4 जण जागीच ठार झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. कर्जत ते नेरळ रोडवरची वाहतूक काही काळ विस्कळीत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. या अपघातानंतर कर्जत ते नेरळ रोडवरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तसेच घटनास्थळी लागलीच अग्निशामक दलाला बोलावण्यात आले असून, अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. परंतु आगीत रिक्षा आणि कारच्या धडकेनंतर स्फोट झाला आणि दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाली. रिक्षा आणि कारमधील एक वाहन CNG असल्यानेच स्फोट होऊन दोन्ही वाहने पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.
@महालाईव्ह न्यूज रायगड
Comments