top of page

उधापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते आकरा वाजेपर्यंत सुरु राहणार...


ree

#लातूर- शहरासह राज्यात कोरोनाग्रस्तांचे रुग्णवाढ्त असताना लातूर जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये शहरात उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अकरानंतर उघडी राहणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जाहीर केले आहे. तसेच यामध्ये ज्या अत्यावश्यक सुविधा आहे, त्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये वैद्यकीय सुविधा असेल तसेच आरोग्य संबंधित ज्या सुविधा असेल त्यांना या मधून वगळण्यात आले आहे. तसेच यामध्ये किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने इत्यादी सुरु राहणार आहेत. तसेच केवळ हातगाड्या वर फिरून फळ-भाज्यांची विक्री सायंकाळी पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत करता येईल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्यापासून शहरासह जिल्ह्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जाहीर केले आहे. त्याअंतर्गत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आव्हान सुद्धा केले आहे.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page