top of page

आवश्यक असेल तेंव्हाच रेमडिसीवीर इंजेक्शन दयावा जिल्हाधिकाऱ्यांचे डॉक्टरांना आवाहन...


ree

#लातूर- जिल्हयात कोव्हिड-19 रुग्णांची वाढ होत असल्याने Inj. Remdisivir (आपत्कालीन वैद्यकीय वापरासाठी ) या Vial ची मागणी मोठया प्रमाणात वाढली असून त्याचा वापर शासनाने ठरवून दिलेल्या क्लिनिकल प्रोटोकॉलनुसारच होणे आवश्यक आहे. कोव्हीड-19 संसर्गातील Inj. Remdisivir प्रिस्क्रिप्शन संदर्भात सविस्तर सुचना निर्गमित करण्यात आले आहेत.याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचारधीन होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी कोव्हीड रुग्णाचं उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या क्लिनिकल प्रोटोकॉलनुसार ज्यांना आवश्यक आहे अशाच रुग्णांसाठी Inj. Remdisivir वापरण्यात यावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करुन Inj. Remdisivir प्रिस्क्राइब करण्यात यावे. Inj. Remdisivir प्रिस्क्राइब करीत असताना संदर्भ क्र. 6 चे Annexure-B मध्ये रुग्णाची माहिती भरावी व ती जतन करण्यात यावी. सर्व नोडल अधिकारी, खाजगी कोव्हीड रुग्णालये यांनी याबाबत सनियंत्रण ठेवावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत Inj. Remdisivir ची विक्री विहित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहे.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page