top of page

NEET-PGच्या परीक्षा चार महिने पुढे ढकलल्या; मोदी सरकारचा निर्णय...


ree

#मुंबई- देशात ढासळत चाललेल्या कोरोना परिस्थितीचा आज पंतप्रधानांनी आढावा घेतला. यात यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशातील NEET-PGच्या परीक्षा तब्बल ४ महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET-PG परीक्षांच्या आधी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत कोणतीही परीक्षा होणार नाहीय. या काळात कोरोना ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्स नर्सेचा स्टाफ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे NEET-PG ची परीक्षा देणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना कोरोना काळात कोविड कर्मचारी होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत ट्रेनिंग देण्यात येईल. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची हे विद्यार्थी काळजी घेऊ शकतात.

अंतिम वर्षांच्या MBBSच्या विद्यार्थ्यांचा उपयोग टेले कन्सल्टेशन म्हणून करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासाठीही या विद्यार्थ्यांचा वापर होऊ शकतो. B.SC किंवा GNM करणाऱ्या नर्सेस वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली पूर्ण वेळ कोविड नर्सेस म्हणून काम करु शकतात.

कोरोनाच्या या कामात सहभागी होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य लसी देण्यात येईल. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना देखिल लागू करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य, वैद्यकीय विभागातील डॉक्टर, नर्सेस, संबंधित व्यावसायिक आणि इतर आरोग्यसेवा कर्मचार्‍यांची रिक्त पदे ४५ दिवसांच्या आत NHM निकषांवर कॉनट्रॅक्ट बेसिसवर प्रवेश प्रक्रिया केली जाईल. देशातील कोरोना महामारीशी लढण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती करण्यात आली आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page