top of page

महाराष्ट्र राजकारण । राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट...


ree

महालाईव्ह न्यूज । मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं रोज बदलताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकीकडे मनसेच्या बैठकीत ठाकरे गटासोबतच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला असताना राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची घेतलेल्या भेटीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद अवघ्या महाराष्ट्रातून घालण्यात येत असल्याचं चित्र सध्या आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दादर, शिवसेना भवन, कल्याण, डोंबिवली भागामध्ये अशा आशयाचे बॅनर देखील लावण्यात आले होते. पण आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page