Search
एका दिवसात अध्यादेश काढता येईल, एवढे पुरावे मी देतो, तज्ज्ञही पुरवतो; जरांगे पाटील...
- MahaLive News

- Sep 6, 2023
- 1 min read

सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर एका दिवसात अध्यादेश निघेल. तेवढे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांना विनाकारण फिरण्याची गरज नाही; असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांनी सरकारला अध्यादेश काढण्यासाठी चार दिवसाचा वेळ दिला आहे. यात माध्यमांशी बोलताना, सरकारला एका दिवसात अध्यादेश काढता येईल, एवढे पुरावे आपल्याकडे आहेत. आम्ही टिप्परभर कागदपत्रे देतो. तुम्ही यावे आणि कागदपत्रे न्यावीत. सरकारने आता कारणे सांगू नयेत, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.























Comments