लातूरात एस.टी. वेगात; महिला सन्मान योजना आणि अमृत योजनेंतर्गत....एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास...
- MahaLive News
- Jul 6, 2023
- 2 min read

महालाईव्ह न्यूज | लातूर- महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना लोक कल्याणकारी ठरतात, हा आज पर्यंतचा इतिहास आहे. आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 75 वर्षाच्या पुढच्या नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये अमृत मोफत प्रवास योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली महिला सन्मान योजना सुरु केली आहे.
अमृत मोफत प्रवास योजना
लातूर विभागात एस. टी. महामंडळाला अमृत योजनेंतर्गत एप्रिल - 2023 मध्ये 13 लाख 69 हजार 152 एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला त्यातून 607.05 लाख एवढे उत्पन्न मिळाले, तर मे या महिन्यात 15 लाख 3 हजार 949 एवढ्या जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला यातून 688.67 लाख एवढे उत्पन्न झाले. जूनमध्ये 14 लाख 75 हजार 525 एवढे जेष्ठ आणि त्यातून मिळालेले उत्पन्न 707.08 लाख एवढे आहे.
महिला सन्मान योजना 50 टक्के सवलत
महिला सन्मान योजनेंतर्गत प्रवास भाड्यातील 50 टक्के सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची संख्या वाढली असून लातूर विभागात एप्रिल -2023 मध्ये 14 लाख 10 हजार 529 एवढ्या महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून 393.16 लाख उत्पन्न मिळाले तर माहे मे महिन्यामध्ये ही महिला प्रवाशांची संख्या वाढून ती 18 लाख 1 हजार 6 हजार 21 झाली त्यातून 564.85 लाख उत्पन्न झाले. माहे जून महिन्यामध्ये हा आकडा 15 लाख 82 हजार 716 एवढ्या महिलांनी प्रवास केला त्यातून 458.98 लाख एवढे उत्पन्न लातूर विभागाला मिळाल्याचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत अशोक जानराव यांनी सांगितले.
महिलांना अर्धे भाडे असल्यामुळे माहेर मुलीकडे जाणे, पाहूणे तसेच छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिलांना याचा मोठा लाभ होत आहे, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असल्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी, देव देवस्थान दर्शनाला जाण्यासाठी आर्थिक भार नसल्यामुळे सोपे झाले आहे. अनेकांनी पंढरपूरची आषाढी यात्रा बसनी केल्याचे सांगितले. या ज्येष्ठासाठीच्या अमृत मोफत प्रवास योजनेमुळे एस. टी. महामंडळाची प्रवासी वाहतुक बस पूर्ण क्षमतेनी भरून जातात तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. चे उत्पन्न वाढत आहे. सर्व अर्थानी ह्या योजना लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र आहे.
Comments