top of page

मराठा आरक्षण आंदोलनाची एसटीला धग; बस रद्द केल्यामुळे 15 कोटींचे नुकसान...


ree

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद मराठवाड्यासह राज्यभरात उमटले. जालन्यात सायंकाळच्या सुमारास लाठीमार झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या लाठीमारानंतर उसळलेल्या हिंसक प्रतिक्रियेची धग एसटी महामंडळाला बसली आहे. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्यात आल्यात. तर, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाल्याने एसटी बसचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने काही ठिकाणी बससेवा तात्पुरती बंद केली. यामध्ये गेल्या तीन दिवसात छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, जळगाव आणि बीड या मार्गावरील बस सेवा बंद आहे. यामुळे 30 हजार फेऱ्या रद्द झाल्या. रद्द फेऱ्यांमुळे सरकारला 15 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. याचा फटका 28 ते 30 हजार प्रवाशांना बसला आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page