Search
लाठीहल्ल्यात पोलिसांना दोष देऊ नका; राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांना सल्ला...
- MahaLive News
- Sep 4, 2023
- 1 min read

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जालना येथे मराठा आंदोलकांची भेट घेतली. जालना लाठीहल्ला घटनेनंतर राज ठाकरे यांना आंदोलनकर्ते मनोज जरांडे यांची विचारपूस केली. राज ठाकरे यांनी यावेळी, राजकारण्यांच्या नादी लागू नका असा सल्ला जरांडे यांना दिला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. यासाठी पोलिसांना जबाबदार धरण्यात आले होते. यावर राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "लाठीचार्जसाठी पोलिसांना दोष देऊ नका, ज्यांनी आदेश दिला होता त्यांना दोषी धरा."
Comments