top of page

लातूर जिल्ह्यातील उदगीर - अहमदपूर भागात संपाचा फटका; कामं खोळंबली...


ree

लातूर- महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपावर आहेत. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.


विविध ठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. लातूर जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपाचा फटका उदगीर आणि अहमदपूर भागातील अनेक ठिकाणी बसला आहे. सकाळ पासूनच बहुतांश भागात वीज नसल्यामुळे उदगीरकराचे अनेक कामे खोळंबली आहेत. उदगीर तालुक्यातील जवळपास 50 टक्के भागात वीज पुरवठा खंडित आहे. अहमदपूर भागातील वीज पुरवठा 70 टक्क्यांपर्यंत बंद आहे. लातूर ग्रामीण भागातील शेती पंपाच्या वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच अनेक भागात वीज पुरवठा सकाळपासून नाही. औराद शहाजानी भागात ही वीज पुरवठा खंडित आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page