ठाणे येथे एसटी बसला अचानक आग, 65 प्रवासी बचावले...
- MahaLive News
- Jan 3, 2023
- 1 min read

ठाण्याच्या उथळसर प्रभाग समिती जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागली. या घटनेनंतर सतर्क झालेल्या चालकाने बस लागलीच रस्त्याच्या बाजूला घेऊन 65 प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितल्याने मोठी दुर्घटना टळली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भिवंडी आगाराची ही बस सकाळी 8 वाजताच्या सुमारास ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने जात होती. या बसचे चालक आनंद विठोबा सवारे हे आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला. बसने पेट घेतला तेव्हा बसमध्ये 65 प्रवासी होते. ठाणे शहर हद्दीत असलेल्या हद्दीतील उतळेश्वर येथे ही घटना आज (3 जानेवारी) सकाळी 8 वाजणेच्या सुमारास घडली. दरम्यान, बसला लागलेली आग तातडीने आटोक्यात आणण्यात आणल्याने संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, प्रवाशांना तातडीने बसमधून उतरविण्यात आले. प्रवासी सुखरुप असले तरी ते बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होते. लेटेस्टली मराठीच्या इंग्रजी भाषेतील सरकारी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी संगितले की, ठाणे शहराच्या हद्दीतील उतळेश्वरजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर बस, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची असून, त्यातून साधारण 65 प्रवासी प्रवास करत होते. ही बस ठाण्याहून शेजारच्या भिवंडी शहराकडे जात होती. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याकडेला घेऊन तातडीने थांबवली. तसेच, प्रवाशांनाही त्वरीत खाली उतरवले. दरम्यान, अग्निशमन दलालाही घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने पुढच्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Comments