केंद्र सरकार घेणार मराठवाड्यातील जिल्ह्यातील शिक्षकांची परीक्षा; परीक्षांची तारीख जाहीर...
- MahaLive News
- Jul 2, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज | मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची परीक्षा 30 व 31 जुलैला होणार आहे. कोरोना काळामध्ये शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. त्यामुळे त्यांनी आता वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करत शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्यामधील शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा पहिल्यांदाच होणार असल्यामुळे त्यामध्ये पालकांसह विद्यार्थ्यांचे देखील लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याबाबत ठरले होते. तर आता या परीक्षांची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा ३० जुलै आणि ३१ जुलै या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे.
या परीक्षेच्या प्राथमिक उद्दिष्टीने शिक्षकांनी ज्ञानाची मापदंडे तपासण्याच्या आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून अभ्यास करण्याच्या संधी दिली आहे. मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यात सुरुवातीला सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये शाळेत जाऊन मुलांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती असल्याचे समोर आले होते. तर लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. लातूर जिल्ह्याचे सीईओ अभिनव गोयल खूप चांगले काम करतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात देखील असणारच, असे केंद्रेकर 'एबीपी माझा'ला मुलाखत देताना म्हणाले होते.
मराठवाड्यातील १८ हजार शिक्षकांनी परीक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा सेंटर असणार आहे. पहिले ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषद आणि अनुदानित संस्थांच्या शिक्षकांची ही परीक्षा होणार आहे.
Comments