top of page

शिक्षकांचीच परीक्षा; मराठवाड्यातील ३५ हजार शिक्षकांना द्यावी लागणार परीक्षा...


ree

औरंगाबाद- मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील शिक्षकांचं बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी लातूर जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प आता मराठवाड्यात राबविला जाणार आहे.


पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंधरवाड्यापूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यानंतर तिथली गुणवत्ता पाहून शिक्षक आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. शिक्षणाचा दर्जाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी झापले, तो एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विभागीय सुनील केंद्रीकरांनीच एक पाऊल टाकत आता शिक्षकांची परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.


या परीक्षांची जबाबदारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि लातूरच्या जिल्हा परिषदेचे सीईओवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओंची उपस्थिती होती. मराठवाड्यातील ८ ते १० हजार जिल्हा परिषद शाळा आणि ३५ हजारांच्या आसपास शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे. लातूरच्या धर्तीवर मराठवाड्यात बेसलाईन असेसमेंट करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आजची परिस्थिती, चार महिन्यांनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन होईल. ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग करण्यात येईल.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page