भारतीय मुस्लिम पहिली शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन....
- MahaLive News
- Aug 8, 2021
- 1 min read

लातूर- सामाजिक कार्यकर्ते तथा संघटन कौशल्य व्यक्तीमत्व मा. सय्यद सलीम यांच्या शुभहस्ते भारताची पहिली मुस्लिम शिक्षीका फातिमाबी शेख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी अब्दुल समद शेख, सय्यद इलीयास अँड आर झेड हाश्मी, अझहरभाई सय्यद, खलील शेख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. भारतीय पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी यांच्या बाततीत इतिहास माहीत नव्हता पण स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचे योगदान मुख्य लेखक सय्यद अहेमद सर यांनी फातिमाबी यांच्या विषयी तामिळी, इंग्रजी पुस्तक लिहिले आहे व लवकरच मराठी मध्ये पुस्तक उपलब्ध होणार आहे. ज्या फातिमाबी शेख यांनी शैक्षणिक कर्तृत्ववान सशक्त महिला ज्यांनी बहुजन सह इस्लामच्या "इक्रा" तत्वानुसार फातिमाबी शेख यांनी प्रचार व प्रसार केला पण आम्ही प्रकाशात राहून फातिमाबी शेख यांना अंधारात ठेवले त्यांच्या इतिहासाच्या बाबतीत गाफील राहिलो. यांच्या विषयी सविस्तर असे पुस्तकाचे प्रकाशन छोटेखानी कार्यक्रमाने येणाऱ्या युवा - युवती यांच्या साठी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी त्यांचे नावे महाराष्ट्र राज्यात फातिमाबी शेख महिला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्र शासनाने एक विद्यापीठ निर्माण करून फातिमाबी शेख यांच्या नावे चालवून राष्ट्रीय व धर्म निरपेक्ष असल्याचे सिद्ध करून देण्याची गरज आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments