जातीवाचक नावे असलेली गावे, रस्ते,चौक,वस्त्यांची नावे बदलण्याची प्रक्रीया सुरू करा; जिल्हाधिकारी...
- MahaLive News
- Jul 6, 2021
- 1 min read

लातूर- महाराष्ट्र राज्यसरकारने ३ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जातीवाचक नावे बदलून त्याजागी महापुरुषांची नावाने किंवा समता नगर, क्रांतीनगर, ज्योतीनगर अशी नामांतरे करण्याचा निर्णय घेतला आला आहे.त्यामुळे जाती वाचक नावे असलेली गावे, रस्ते,चौक,वाड्या वस्त्यांची पाहणी करून त्यांना बदलण्याची प्रक्रीया सुरू करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जातीवाचक नावांवर आधारित शहरी आणि ग्रामीण भागातील वस्ती व रस्त्यांबाबत आयोजित बैठकीत दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एम बी शिंदे.जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस एन खमीतकर,नगर पंचायत चाकूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, नगर पंचायत रेणापूरचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे, आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी उपस्थित अधिका-यांना आपल्या विभागातील प्रत्येक वस्ती आणि रस्ते व चौकांची पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले.ते म्हणाले फक्त अभिलेख सादर करून चालणार नाही तर याकडे बारकाईने लक्ष देऊन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करावाजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनुदान मंजूर झालेल्या वस्त्या,रस्ते आणि मोहल्ला यांच्या नावांची व्यकतीश: तपासणी करून कार्यादेश निर्गमित करावेत. आपल्या तपासणीत अशी नावे आढळुन आल्यास त्याअनुषंगाने ठराव करून नाव बदलण्यासाठी संबंधित यंत्रणेला मुदत द्या तसेच DPDC च्या वेळेस सर्व जातीवाचक नावे बदलून त्याजागी महापुरुषांच्या नावाने बदल झाल्याची खात्री करूनच पुढील कार्यवाही करावी असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यावेळी म्हणाले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments