रिलायन्स लातूर पॅटर्नने स्विकारली गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी...
- MahaLive News

- Jul 6, 2021
- 1 min read

लातूर- कोरोनाच्या महामारीने जगामध्ये बरेच बदल घडले आहेत बरीच मुलं अनाथ झाली. कोणी वडील गमावले, कोणी आई गमावली, कोणी पत्नी, कोणी पती, कोणी भाऊ, कोणी बहिणी तर कोणी मुलं गमावली अनेक कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला. या संकट काळात गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची मोहीम हाती घेतली आहे. हा विषय घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची टीम रिलायन्स लातूर पॅटर्न कॉलेजचे संचालक मा. उमाकांत होणराव यांच्यापुढे ठेवला असता मा. होणराव यांनी तात्काळ मागणी मान्य केली आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या टीमचा यथोचित सत्कारही केला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक सद्भावना जपणार्या संवेदनशील व्यक्तीमत्वांनी मदतीचे हात पुढे केले याचं उत्तम उदाहरण म्हणून लातूर येथील रिलायन्स लातूर पॅटर्न व ञिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविध्यालय लातूर या संस्थेकडून अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत आहे या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या उमरगा येथील दोन मुली आयेशा व खुतेजा यांचे शिक्षण पुर्णपणे काॕलेजनी मोफत केले आहे त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या विनंतीवजा मागणीवरून श्रुती सुरेश बनसोडे या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी रिलायन्स लातूर पॅटर्न कॉलेजने स्विकारली असल्याने संस्थेचे संचालक उमाकांत होणराव यांचा गौरव करण्यात आला.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News

























Comments