top of page

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा कर्नाटक दौरा रद्द...

ree

महाराष्ट्राचे मंत्री आणि सीमा समन्वयक समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई मंगळवारी दि. 6 बेळगाव दौर्‍यावर जाणार होते. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्र्यांचा दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता; पण त्यादिवशी अशा प्रकारचा वाद तयार करणे योग्य नसल्याचे सांगत हा दौरा रद्द केल्याचे अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनी सांगितले. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र किंवा कर्नाटक निर्णय घेवू शकत नाही. यासंदर्भात निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. त्यामुळे विनाकारण नव्याने वाद तयार करणे योग्य होणार नाही. महाराष्ट्राने मोठ्या ताकदीने आपली केस मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल यावर आपण विश्वास ठेवला पाहीजे. मंत्र्यांचा दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. तेथील एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही; पण महापरिनिर्वाणदिनी अशा प्रकारचा वाद तयार करणे, आंदोलन करणे योग्य नाही. स्वतंत्र भारताच्या प्रदेशात कोणीही कोणाला जाण्यापासून थांबवू शकत नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय करता येईल याबाबत विचार सुरू आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page