top of page

मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी; संजय राऊत...


ree

नाशिक- जत तालुक्याच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुंबची योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. तुंबची योजना तातडीने सुरू करत ते यतनाळ येथील ओडापात्रातून सोडण्यात आले. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे.

यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली म्हणता, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर आणि सरकारवर थुंकतोय. आता कुठे गेली तुमची क्रांती? आता खरी क्रांती करण्याची वेळ आली आहे, मग मूग गिळून का बसला आहात, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व खासदर संजय राऊत यांनी करीत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यावी, असा संताप व्यक्त केला. महाराष्ट्रावर असे आक्रमण गेल्या ५०-५५ वर्षांत झाले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे.

आता क्रांतीची वांती झाली का, असा सवाल उपस्थित करीत, राऊत यांनी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्र सोडले.



- सीमा प्रश्नाबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही. जत, अक्कलकोट येथे दोन ते तीन महिन्यांपासून उठाव सुरू आहे. परंतु, या महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांपुरता आहे. -एखाद-दुसरा आमदार गेला म्हणजे पक्ष गेला असे होत नाही. पक्ष जमिनीवर आहे. सर्व पदाधिकारी मला भेटून गेले.

- आमची सुरक्षा काढली. आम्हाला कोणी हात लावतेय का? आम्ही एकटे फिरतोय मर्दासारखे. तुम्ही सुरक्षेत फिरतायत याचा अर्थ तुम्हाला भीती आहे.

- खर्गेंनी मोदींना शंभर तोंडाचा रावण म्हटल्यानंतर त्यांनी हा गुजरातचा अपमान असल्याचे सांगितले. मग महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय आणि तुम्ही गप्प बसला?


- राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. शिवसेनेतून फुटलेले हे गद्दार आहेत. त्यांच्या माथी गद्दारीचा कलंक कायम राहील. ‘दीवार’ सिनेमाप्रमाणे यांच्या बायकापोरांना लोक गद्दारांचे नातेवाईक म्हणतील.

- वैजापूरच्या फुटलेल्या आमदाराला लोकांनी केवळ चपला मारायचे बाकी ठेवले. त्यांना गावातून काढले होते. जे शिवसेनेतून फुटलेले आहेत, त्यांचे भविष्य चांगले दिसत नाही.

मी पक्षाचा नेता असून ‘सामना’चा संपादक आहे. शिवाय तुरुंगातूनही अनेक अग्रलेख लिहिले. मुळात माझा कंड रिपोर्टरचा, त्यातही क्राइम रिपोर्टर. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय चाललेय हे कळतेय. त्या गटात काय चाललेय हे मला कळलेय. मात्र, आता ही वेळ नाही. वेळेवर स्फोट होईल, असा इशारादेखील त्यांनी दिला. येत्या तीन ते साडेतीन महिन्यांत सरकार पडू शकते. राजकारण चंचल आहे. ज्याप्रमाणे तुम्ही राजकीय डाव खेळत आहात, त्यात कोणी कुणाचा नसतो, याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल, असा इशाराच राऊत यांनी दिला.


ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

bottom of page