Search
दिवाळीत शंभर रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा; शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय...
- MahaLive News
- Oct 3, 2023
- 1 min read

मुंबई- आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यामध्ये शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी... (विधी व न्याय)
इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा...( गृहनिर्माण)
Comments