अतिवृष्टी गोगलगाय मोझक रोगाचा धोक्यामुळे चार गावाच्या शेतकऱ्यांनी 500 एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर
- MahaLive News
- Oct 3, 2022
- 1 min read

लातूर- जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चार गावांच्या अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांवर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. यामुळे किमान तीन कोटी रुपयांचा फटका चार गावाच्या शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यातील ही पहिलीच घटना असावी. लातूर जिल्हा हा सोयाबीन कोठार अशी ओळख असलेला जिल्हा. या जिल्ह्यात सहा लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्रापैकी किमान साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. दुर्दैवाने याच सोयाबीन कोठार अशी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्याला अतिवृष्टी गोगलगाय मोझक रोगाचा धोका झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
औसा तालुक्यातील लाडवाडी, गाढवेवाडी, गाडवेवाडी तांडा, तपसे चिंचोली, नागरसोगा या गावांच्या शिवारातील किमान पाचशे एकर क्षेत्रावरील सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फुलगळ आणि शेंगांमध्ये दाणे भरले नसल्यामुळे नुकसानीत येत असलेल्या शेतकऱ्यांनी सव्वाशे शेतकऱ्यांनी किमान 500 एकर क्षेत्रावर रोटावेटर फिरवून नष्ट केले आहे.यासाठी किमान एकंदरीत साठ लाखांचा खर्च आला तर या सोयाबीन पासून मिळणारे किमान तीन कोटी रुपयांचे उत्पन्न हातातून गेले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना जगावं कस असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी शासकीय धोरणावर आपला संताप व्यक्त करत आहेत. या शेतकऱ्यांना तातडीची शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
Comments