ग्राम रोजगार सेवक यांना शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे...
- MahaLive News
- Aug 30, 2021
- 1 min read

लातूर- राज्यांचे रोहयो व फलोत्पादन मंत्री ना. संदीपानजी भुमरे हे लातूर दौऱ्यावर आले असता लातूर येथील विश्रामगृह येथे जाऊन ग्राम रोजगार सेवक शिष्टमंडळाने भेट घेतली. गेली अनेक वर्षापासून ग्राम रोजगार सेवक हे अनियमित मानधनावर काम करत आलेला आहे तरी राज्य शासनाने राज्य शासनाने त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे , मागील गेल्या अनेक महिन्यापासून ग्राम रोजगार सेवकांचे मानधन मिळाले नाही,सादिल मिळाले नाही तर अनेक कामे या ग्राम रोजगार सेवकला असून यांना फिक्स मानधन किंवा वेतन नाही आणि काम जबाबदारी मोठी असल्याने हे ग्राम रोजगार सेवक रोजगार हमी तील मुख्य दुवा आहेत परंतु हे एक पद असे आहे की जे यंत्रणेत महत्त्वपूर्ण आहे परंतु त्याची यंत्रणेने कोणतीही दखल घेतलेली नाही,आणि पार्ट टाइम अशी नोंद असून केवळ मानधनावरत हे पद चालविले जाते. गेली पंधरा वर्षापासून ग्राम रोजगार सेवक असच काम करत आलेले आहेत. यामुळे या ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन कायम पगार किंवा वेतन चालू करावे आणि मिळणारे सध्याचे कमिशन वजा टक्केवारी त्यांच्या वैयक्तिक खात्यावर तालुका स्तरावरुन टाकण्यात यावे अशा प्रमुख मागण्या या ग्रामरोजगार सेवकांच्या आहेत. रो ह यौ मंत्री यांना भेट घेण्यास गेलेल्या शिष्टमंडळात मध्ये लातूर जिल्हा अध्यक्ष चांद शेख, औसा तालुकाध्यक्ष भागवत शिंदे, विठ्ठल पांचाळ, जिल्हा सचिव अमोल घायाळ, दिपक सोनवते, बालाजी पोतदार, धनराज देडे, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भरपूर प्रमाणात रोजगार सेवक उपस्थित होते व इतर जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments