निवडणुकीआधी BJP ची नवीन टीम घोषित; महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना मिळली जबाबदारी...
- MahaLive News
- Jul 29, 2023
- 1 min read

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपन नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. भाजपनं राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सचिव यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती झाली आहे. भारतीय जनता पार्टीने पार्टीने राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय सह संघटन महामंत्री, राष्ट्रीय सचिव आणि कोषाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केलीय. यात 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय महामंत्री आहेत. बीजेपीने 13 पैकी दोन मुस्लिम नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवल आहे. अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटीचे माजी वाइस चांसलर तारिक मंसूर यांना भाजपा उपाध्यक्ष बनवलं आहे. केरळचे अब्दुल्ला कुट्टी आधीपासूनच भाजपा उपाध्यक्ष आहेत. भाजपाने बीए एल संतोष यांना राष्ट्रीय महामंत्री (संघटना) बनवलं आहे. या लिस्टमध्ये पक्षाच्या 13 राष्ट्रीय सचिवांची नावे आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना केंद्रीय संघटनेत जबाबदारी मिळाली आहे. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.
मध्य प्रदेशचे सौदान सिंह यांना राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत स्थान मिळालं आहे. उत्तर प्रदेशातून येणारे तारिक मंसूर यांच्याशिवाय खासदार लक्ष्मीकांत बाजपाई आणि रेखा वर्मा यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं आहे. झारखंडचे माजी सीएम रघुबर दास यांना भाजपाच नवीन राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे. केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये भाजपाने 13 राष्ट्रीय सचिवांच्या नावाची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांची नाव आहेत. आंध्र प्रदेशातून सत्या कुमार, दिल्लीतून अरविंद मेनन, पंजाबमधून नरेंद्र सिंह रैना, राजस्थानातून अल्का गुर्जर, पश्चिम बंगालमधून अनुपम हाजरा, मध्य प्रदेशातून ओमप्रकाश धुर्वे, बिहारमधून ऋतुराज सिन्हा, झारखंडमधून कामख्या प्रसाद तासा, उत्तर प्रदेशातून सुरेंद्र सिंह नागर आणि केरळमधून अनिल एंटनी यांना राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं आहे.
Comments