top of page

'विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी अस्वस्थ'; शरद पवार...


ree

'देशभरातल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत, त्यामुळे ते पदाला न शोभणारे वक्तव्य करत आहेत, पंतप्रधान पद, संसदीय सदस्य ही एक संस्था आहे, त्यामुळे त्या पदाचा मान ठेवला पाहिजे याची काळजी मोदींनी घ्यायला हवी,' असे मत शरद पवारांनी मांडले आहे. दरम्यान देशातल्या विरोधकांची पुढील बैठक 13 आणि 14 जुलै रोजी बंगळुरू येथे होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली ? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का ? असा टोलाही पवारांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता ? असा आरोप केला होता. या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page