top of page

सक्षम व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने लातूर येथे हेलन केलर यांची जयंती साजरी...


ree

लातूर- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर व सक्षम च्या वतीने दि. 27 जून 2021 रोजी हेलन केलर यांच्या जयंतीनिमीत्त बौद्धिक दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. देवाशिष रुईकर यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तींची तपासणी करुन उपचाराकरिता मार्गदर्शन केले. शिबीराच्या उदघाटन हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले. यावेळी संवेदनाचे कार्यवाह सुरेश पाटील, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे डॉ. योगेश निटुरकर, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, व्यंकट लामजणे सक्षम चे देवगिरी प्रांत सचिव श्रीराम शिंदे व जि. सचिव दिपक क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. याचवेळी बौद्धिक दिव्यांगांना निरामय आरोग्य विमा योजनेच्या कार्डचे वाटप करण्यात आले. निरामय आरोग्य विमा योजना ही राष्ट्रीय न्यास, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने राबविली जाते. राष्ट्रीय न्यासची स्टेट नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्राकरिता संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निरामय आरोग्य योजनेअंतर्गत 167 बौद्धिक दिव्यांगाना निरामय आरोग्य विमा योजनेचे कार्ड वितरीत केले जाणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात चि. मिथीलेश पाटील, चि. गोपाळ मोटाडे, चि.अभिषेक कौळखेरे, चि. समर्थ खेमे, चि. प्रथमेष आष्टुरकर यांना निरामय कार्ड वितरीत करण्यात आले. या योजनेअंतर्गत वार्षिक 1 लाख रुपयांचा आरोग्य विमा या बौद्धिक दिव्यांगांना मिळणार आहे. दिव्यांगत्वासंबंधी शस्रक्रिया, विविध थेरपी, अन्य उपचार या योजनेतून दिव्यांगांना घेता येणार आहे. या योजनेकरिता दिव्यांगत्व प्रमाणपत्र, फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेचा लाभ बौद्धिक दिव्यांग, सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम, बहुविकलांग व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रसंगी शिक्षक, पालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिजीओथेरपीस्ट डॉ. मयुरी बिल्लावार, विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने, योगेश्वर बुरांडे, बस्वराज पैके, आत्माराम पळसे यांनी परिश्रम घेतले.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज लातूर

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page