top of page

एसटी संप काळातील मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी एसटीचा मोठा निर्णय...

ree

मुंबई- महाराष्ट्र राज्य वाहन महामंडळ कर्मचारी यांनी 2021मध्ये पुकारलेल्या प्रदीर्घ संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात ओढवलेली होती, याच काळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आपले जीवन संपवले होत. शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी जीवनयात्रा संपवली मार्च 2022 मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या 124 अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते.



या संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच्या जागेवर नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे . संप काळात 124 कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच जागेवर नोकरी मिळणार आहे .त्याच बरोबर या वारसांना सेवा सरलतेचा लाभ देखील मिळणार आहे. या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. जवळपास चार महिने एसटी सेवा ठप्प होती. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मुख्य मागणी एसटी कर्मचारी करत होते, परंतु सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती. मार्च 2021 मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे या संपातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर येण्यास सुरुवात केली होती.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page