समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव कार दुभाजकाला धडकली, एकाचा मृत्यू, चार जखमी...
- MahaLive News
- Jun 27, 2023
- 1 min read

समृद्धी महामार्गावर आज मंगळवारी दुपारी कारचा अपघात झाला. अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी एकाच कुटुंबातील होते. जखमींना उपचारासाठी जालना येथे भरती करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील नागपूर काॅरिडोर वर सिंदखेडराजा नजीक चॅनेल क्रमांक ३३५ वर हा अपघात घडला. भरधाव कार (MH 05 DA 1927) ही नागपूर येथून नाशिककडे जात होती. नेल ३३५ नजीक ही भरधाव कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकाला धडकली. यात वाहनातील पाच प्रवासी जखमी झाले. यातील एका प्रकृती खालावलेल्या जखमीचा मृत्यू झाला आहे. सिंदखेडराजा व दुसरबीड येथील रुग्णवाहिकाद्वारे जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
@महाLive News
📌 आता मिळवा नवीनतम घटनांची न चूकता, महत्त्वाच्या मुद्द्यांची अद्यापत्तेची माहिती 🪀Whatsapp वर...
महालाईव्ह न्यूज
तुमची नक्कीची ब्रेकिंग न्यूज
Now end your daily news hunt here!!
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9404277731
Comments