युवक व क्रिडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावाबैठक संपन्न
- MahaLive News
- Aug 26, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज । लातूर- दि.२५.०८.२०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान, शाहु, फुले, आबेडकर यांच्या विचारांवर राज्यातील सर्व सामान्य गरीब, कामगार, अल्पसंख्ययाक, मागासवर्गीय यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व काम करीत आहोत. लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षवाढीसाठी पदाधिकारी व बूथ समिती वर काम करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर थांबणार आहे. राज्यात ना अजित दादा पवार यांच्या राज्यात विविध ठिकाणी महासभा होणार आहेत त्याची सुरूवात बीड येथून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महासभेचे आयोजन दि.२७.०८.२०२३ रोजी करण्यात आलेले आहे.त्या सभेसाठी लातूर जिल्हयातील जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आ. विक्रम काळे यांनी जिल्हाभरातील पदाधिकारी यांचा आढावा घेतला तर आ. बाबासाहेब पाटील यांनी लवकरात लवकर जिल्हा ते गाव पातळीपर्यंत कार्यकारिणी गठित केली जाईल याची माहिती दिली आहे. याबैठककीस जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख, ज्येष्ठ नेते ॲड.व्यंकटराव बेद्रे, माजी महापौर अख्तर मिस्त्री,मुर्तुजा खान,बबन भोसले,महिला जिल्हाध्यक्ष शिंगडे , महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रणिता सूर्यवंशी,महिला जिल्हा कार्याध्यक्ष दिपाली औटे व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments